मुलकरांना दिलासा: आयर्न ओअरमुळे होणारे प्रदूषण टळले, मालधक्का प्रकल्प रद्द

May 09, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित मालधक्का (गुड्स यार्ड) प्रकल्प रद्द करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेत या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, संभाव्य प्रदूषण आणि पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता मुल येथे मालधक्का उभारला जाणार नसल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. (बल्लारशा ते मुंबई, ताडोबा एक्स्प्रेस होणार सुरु)



दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, अजय दुबे सदस्य ZRUCC मध्य रेल्वे मुंबई, रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुल शहरातील प्रस्तावित गुड्स यार्ड प्रकल्पामुळे आयर्न ओअर आणि इतर खनिज पदार्थांच्या लोडिंग-अनलोडिंगमुळे मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होण्याची शक्यता होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, पिकांचे नुकसान होईल तसेच जलस्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण होईल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर ठामपणे मांडली.



मुल शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि ग्रामीण शांततेवर होणारा परिणाम लक्षात घेता हा प्रकल्प जनहिताच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. मुनगंटीवार यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी मुल शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि ग्रामीण शांततेवर होणारा परिणाम लक्षात घेता हा प्रकल्प जनहिताच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. मुनगंटीवार यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी संबंधित प्रकल्प त्या ठिकाणी होणार नसल्याचे स्पष्ट करत स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.

Leave a Comment

+