Women Drug Traffickers: बल्लारपूरमध्ये गुन्हे शाखेने गांजा तस्करीत आंतरराज्यीय टोळीला केली अटक

May 10, 2026 by Prakash Hande

बल्लारपूर (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्ह्यातील अंमली पदार्थाची तस्करी, विक्री थांबविण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे, जिल्ह्यातून अंमली पदार्थ पूर्णतः हद्दपार व्हावे यासाठी चंद्रपूर पोलीस प्रयत्न करीत आहे. अश्यात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने आंतरराज्यीय टोळीला ११ किलो गांजा सह मुस्क्या आवळल्या असून यावेळी ५ आरोपीना अटक करण्यात आली, यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे.

 

काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने ओडिशा वरून एका इसमाने विक्रीसाठी आणलेला ८ किलो गांजा जप्त केला होता, या गांजा तस्करीमध्ये कोण सामील आहे, यावर पोलिसांची करडी नजर होती. अश्यातच काही महिला ओडिशा राज्यातून गांजा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने बल्लारपूर-राजुरा सास्ती मार्गावर सापळा रचला.

 

यावेळी संशयास्पद ऑटो क्रमांक MH ३४ BH १६२६ ला थांबविता त्याची झडती घेतली असता त्यामध्ये ११ किलो गांजा पिशव्यांमध्ये आढळून आला, यावेळी पोलिसांनी ३८ वर्षीय मोहम्मद युनूस अली उर्फ बादशाह ऑटो चालक बल्लारपूर, ६५ वर्षीय लालचंद गणेश केसकर बल्लारपूर, ५० वर्षीय श्रीमती उमा हामू नूनावत राहणार मुळगू जिल्हा वारंगल तेलंगणा, २४ वर्षीय ललिता आकाश दामले इटारसी मध्यप्रदेश व २८ वर्षीय आरती गुलाब परते राहणार भोपाळ मध्यप्रदेश यांच्यावर बल्लारपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीजवळून ११ किलो गांजासह गुन्ह्यात वापरलेला ऑटो, ४ मोबाईल असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गांजा ओडिशा राज्यातील मुनिगडा येथील मुख्य पुरवठादार इंद्रजित पाराससेठ आणि रामबाबू यांच्याकडून आणला होता, त्यांचा शोध सुरु आहे. 

 

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी स्वामी चालेकर, शेखर माथनकर, किशोर  वैरागडे, अजय बागेसर, गोपीनाथ नरोटे, छाया निकोडे, अपर्णा मानकर, गजानन मडावी व सायबर पोलिसांनी केली.          

Leave a Comment

+