रॉयल्टी संपली तरी उत्खनन सुरूच: भद्रावतीत तलावाजवळ गौण खनिज चोरी उघड

May 09, 2026 by Prakash Hande

भद्रावती (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्हा खनिज साधन संपत्तीने नटलेला जिल्हा आहे, मात्र काही माफिया या संपत्तीचा नाश करताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असणाऱ्या मोहबाळा गावातील तलावाजवळील जमिनीवर एका कंत्राटदाराने गौण खनिज चोरीचा सपाटा लावला आहे विशेष बाब म्हणजे रॉयल्टी संपल्यावर सुद्धा काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून तलावाजवळील जमीन अक्षरक्षा पोखरन्यात आली आहे. (अवैध धंद्यावर कारवाई करा, पालकमंत्री वुईके यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश)

 

जिल्ह्यात वाळू तस्करांचे मोठे सिंडिकेट सक्रिय आहे, तसेच वरोरा भद्रावती या भागात सुद्धा हीच परिस्थिती आहे, मधल्या काळात वरोरा मध्ये वाळू घाटावर भाजप नेत्याची हत्या करण्यात आली होती. मोहबाळा जवळील तलावाजवळील जमिनीत गौण खनिजासाठी जागोजागी खड्डे करण्यात आले होते. सदर बाब राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांना हि बाब माहिती पडल्यावर त्यांनी याबाबत महसूलमंत्री, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, खनिज अधिकारी, तहसीलदार यांना निवेदनामार्फत गौण खनिज चोरीची निवेदनामार्फत तक्रार दिली.

 

२७ एप्रिल ला रॉयल्टी संपली मात्र त्यानंतर सुद्धा गौण खनिजाचे उत्खनन त्या कंत्राटदाराने सुरु ठेवत सदर खनिज दुसऱ्या ठिकाणी विक्री करणे सुरु केले, विशेष बाब म्हणजे हे कृत्य करीत असताना प्रशासनाची डोळेझाक सुरु होती, माहिती दिल्यावर सुद्धा प्रशासनाने यावर साधी कारवाई करण्याचे सौहार्द दाखविले नाही. विशेष बाब म्हणजे ठाकूर यांच्या तक्रारीनंतर गौण खनिजाची चोरी करणाऱ्या कंत्राटदाराने खड्डे बुजविण्याचे काम केले, याचाच अर्थ आधी चोरी व नंतर पुरावे लपविण्याचा प्रयत्न गौण माफियांकडून केला गेला.

 

शासनाचा कोट्यवधी रुपयांच्या महसूल बुडविणाऱ्या कंत्राटदाराला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करीत कारवाई करण्यात यावी त्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करीत गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात यावे अशी मागणी संजय ठाकूर यांनी निवेदनामार्फत केली आहे.

Leave a Comment

+