गोंडपिपरी - वर्ष २०२३ मध्ये भूमिगत केबलचे ड्रम जंगल परिसरात खाजगी कंपनीद्वारे ठेवण्यात आले होते, ११ एप्रिल २६ ते २७ एप्रिल दरम्यान सदर केबलचे ड्रम अज्ञाताने चोरी केल्याची घटना घडली. धाबा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी ५ आरोपीना अटक केली. (१०१ ग्राम एमडी चंद्रपुरात, गुन्हे शाखेने वाट अडवली)
डस्कलाईन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नागपूर चे जनरल मॅनेजर समीर रमेश डिवरे यांची कंपनी महावितरणमध्ये नवीन विद्युत लाईन टाकण्याचे काम करीत असते. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली, वटराना जंगल परिसरात भूमिगत केबल टाकण्याच्या कामासाठी सदर कंपनीने वर्ष २०२३ मध्ये गोजोली सुकवासी फाटा जंगल परिसरात एचटी पॉवर केबल चे २ ड्रम ठेवले होते.
सदर केबलचे ड्रम एप्रिल महिन्यात चोरी गेले, याप्रकरणी डिवरे यांनी धाबा पोलीस स्टेशनमध्ये केबल चोरीची तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला, तांत्रिक पद्धतीने तपास करीत पोलिसांनी आरोपीना निष्पन्न करीत ६ मे ला अटक केली. यामध्ये ३४ वर्षीय राकेश जागेश्वर भोयर व्यवसाय ठेकेदारी राहणार नागपूर, ३९ वर्षीय ज्योतिष प्रभू प्रसाद ठेकेदारी नागपूर जिल्हा, २९ वर्षीय अभिनयकुमार रामलक्ष्मण प्रसाद मजुरी राहणार उत्तरप्रदेश हल्ली मुक्काम नागपूर, ३४ वर्षीय हरिप्रसाद श्यामजी उईके छिंदवाडा हल्ली मुक्काम नागपूर व २७ वर्षीय दीपक चेकर उईके छिंदवाडा हल्ली मुक्काम चंद्रपूर यांचा समावेश आहे.
आरोपीकडून चोरी गेलेला केबलचा ड्रम एकूण किंमत २३ लाख ८८ हजार ३०५ रुपये, विशेष बाब म्हणजे आरोपींनी केबल चोरी करताना क्रेन चा वापर केला होता, गुन्ह्यात वापरलेले वाहन मोबाईल मुद्देमाल असा एकूण ८८ लाख ३४ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुबोध वंजारी, पोलीस कर्मचारी प्यारेलाल देव्हारे, श्रावण कुत्तरमारे, गजानन तुरेकर यांनी केली.
Leave a Comment