घुग्घुस - घुग्घुस येथील राजीव रतन चौकात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा सविस्तर आढावा घेतला. पुलाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून सध्या पॅचवर्क, अंतिम टप्प्यातील तांत्रिक कामे व इतर किरकोळ कामे शिल्लक आहे. हे काम तातडीने पूर्ण करून पुलीया रहदारिकारिता लवकर सुरु करण्याचे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांना दिले आहे. (अवैध धंद्यावर कारवाई करा - पालकमंत्री वुईके)
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश राजनकर, वणी वेकोली एरियाचे मुख्य महाप्रबंधक करमरकर, महारेलचे श्रीकांत पंचवटी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राठोड, भारतीय जनता पार्टीचे घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, घुग्घुस नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, गटनेत्या मीना मोरपाका, नगरसेवक विवेक बोढे, आशिष मासिरकर, गणेश पिंपळकर, राजू रेड्डी, नगर सेविका वैशाली ढवस,आशा पानघाटे, पल्लवी घुले, सुनीता पेंदोर, स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा, नरुल सिद्दिकी, नगर बलराम डोडाणी, तुषार सोम, शेखर शेट्टी, नामदेव डाहुले, गणेश शेंडे, संतोष नुने, मुन्ना लोडे, विनोद चौधरी, पूजा दुग्गम, श्रीनिवास इसारप, राजकुमार गोडसेलवार, साजन गोहणे, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सुचिता लुटे, उषा अगदारी, सोनल भरटकर, नंदकिशोर यादव, चैताली सातपुते, रमन तांड्रा, राजपाल वर्मा, ओम महाकाली, राजेश मोरपाका, श्रीनिवास तालपेल्ली, सुनीता पाठील, लखन हेकरे, संजय वखाले, गणेश उईके, गौरव ठाकरे, मयूर कलवल, श्याम अगदारी, सुरज मोरपाका, तुळशीराम ढवस आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर मतदारसंघात विकासकामांचा वेग कायम ठेवत नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयी अधिक सक्षम करण्यासाठी हा पुल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना सुरक्षित, जलद व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पाहणीदरम्यान आमदार जोरगेवार यांनी पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, सुरक्षा उपाययोजना, वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा तसेच कामाची सद्यस्थिती याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. कामामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
यावेळी पुलावरील उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देत, पुल लवकरात लवकर वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश आ. किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ट्रायल प्रक्रियेदरम्यान सर्व तांत्रिक बाबींची काटेकोर तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या तातडीने पूर्ण करण्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच परिसरातील नागरिकांना भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. विकासकामांची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर देत, मतदारसंघातील प्रत्येक महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ. किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस येथील नागरिकांसमवेत लोहा पुलाची पाहणी केली. हा पुल सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील रहदारी अधिक सुलभ व सुरक्षित होण्यास मदत होईल. पुलाचे काम गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावे तसेच कामामध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. यावेळी वेकोलीचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक व्यापारी मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Comment