नागपूरहून चंद्रपुरात येणारी MD Powder कशी पकडली? संपूर्ण घटना

May 08, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - जिल्ह्यातील गुन्हेगारीचे कारण म्हणजे व्यसन, दारू सह आता एमडी पावडरच्या व्यसनाने तरुणांना वेड लावलं आहे, हे व्यसन पूर्णतः संपुष्टात यावे चंद्रपूर पोलीस प्रयत्नशील आहे. चंद्रपुरात अंमली पदार्थ आणण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेने हणून पाडला. चंद्रपूर गुन्हे शाखेने एका युवकाला एमडी पावडर सह अटक केली. आरोपी युवकांकडून तब्बल १०१ ग्राम एमडी पावडर जप्त करण्यात आले. याप्रकरणी ३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पत्नीने १ लाखात दिली पतीच्या हत्येची सुपारी)

 

चंद्रपुरात नागपूर जिल्ह्यातून एमडी पावडरची तस्करी होत आहे, यामागील सूत्रधार कोण हे अद्यापही समजले नसले तरी या पावडरची विक्री व खरेदी करणारे आरोपी हे नवीनच या धंदयांत उतरणारे आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ७ मे रोजी गोपनीय माहिती मिळाली कि चंद्रपुरात एक इसम एमडी पावडर विक्री करण्यासाठी चंद्रपुरात येणार आहे.

 

पोलिसांनी रात्री ९ वाजताच्या दरम्यान चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर गुन्हे शाखेने सापळा रचला, यावेळी एक युवक दुचाकी वाहन क्रमांक MH ३१ FH २०४९ ने येत असल्याचे पोलिसांना दिसताच त्याला थांबवीत त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याजवळून १०१ ग्राम एमडी पावडर जप्त करण्यात आले.

 

एमडी पावडर घेऊन येणाऱ्या आरोपीचे नाव २३ वर्षीय अमित कृष्णा गजभिये असून तो इंदोरा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सदर एमडी पावडर हे नागपुरातील हर्षल टेम्भेकर यांच्याकडून घेत ते चंद्रपुरातील सोहेल शेख ला विक्रीकरिता देण्यात येणार होते. गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे सदर एमडी पावडर चंद्रपूर जिल्ह्यात येण्यापूर्वीच जप्त करण्यात आले. आरोपीजवळून एमडी पावडरसह मोबाईल व दुचाकी असा एकूण ५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर वरोरा पोलीस स्टेशनमध्ये NDPS अन्वये कलम ८ (क), २२ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार पथकातील पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, कार्तिक खनके, अनिमेश भोंगळे व सायबर पोलिसांनी केली.       

 

Leave a Comment

+