Wife Hires Killers: चंद्रपूरमध्ये शिक्षक पतीचा 1 लाख सुपारी देऊन खून

May 04, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - शिक्षक नवऱ्याच्या त्रासापायी बायकोने १ लाखांची सुपारी देत नवऱ्याला यमसदनी पाठविल्याची घटना चंद्रपुरातील भद्रावती मध्ये उघडकीस आली असून स्थानिक गुन्हे शाखेने पत्नीसह ४ आरोपीना अटक केली.

१ मे रोजी भद्रावती तालुक्यातील घोडपेठ मधील कर्मवीर शाळेच्या समोरील शेतशिवारात असलेल्या मंदिरजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरु केला होता. (चंद्रपुरात भीषण अपघात, ४ ठार)

 

गुन्हे शाखेने याप्रकरणी अधिक तपास केला असता मृतक ४६ वर्षीय रवींद्र तुळशीराम कुळमेथे राहणार मुधोली चेक तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली अशी ओळख पटली, मृतक रवींद्र कुळमेथे हा शिक्षक होता, दारूचे व्यसन असल्याने तो नोकरीवर रुजू होत नसल्याने पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे.

 

या त्रासाला कंटाळून पत्नी ४२ वर्षीय दीपमाला रवींद्र कुळमेथे या आपल्या कृषी नगर वरोरा आपल्या माहेरी गेल्या होत्या, यादरम्यान तिची ओळख ४७ वर्षीय वर्ष राजू परचाके राहणार लवकुश नगर मानेवाडा नागपूर सोबत झाली, दीपमाला नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत वर्षा ला माहिती दिली होती, मला या त्रासापासून मुक्त व्हायचे आहे असे ती वर्षा ला म्हणायची.

वर्षा ने आपला वाहन चालक ३१ वर्षीय सोनू उर्फ प्रवीण नरेंद्र कालोकर राहणार रामटेक नागपूर याला सोबत घेतले, आपल्याला अजून एक माणूस या कटात हवा असे वर्षा ने प्रवीण ला सांगितले असता त्याने २८ वर्षीय मजूर नाझीर नसरुल अन्सारी राहणार चिंचभवन अमरावती रोड नागपूर याला सोबत घेतले.

 

दीपमाला ने वर्षा ला या कामासाठी १ लाख रुपये दिले होते, १ मे रोजी चारचाकी वाहन क्रमांक MH ३१ DC ८९१९ मध्ये वर्षा सह नाझीर व प्रवीण ने रवींद्र ला कार मध्ये सोबत घेत घोडपेठ मधील सुनसान जागेत घेऊन गेले, त्याठिकाणी रवींद्र ला दारू पाजली, नंतर रवींद्र चा गळा आवळून खून केला. मृतदेहाला सुनसान जागेवर सोडत आरोपीनी पळ काढला.

स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिकरीत्या तपास करीत या गुन्हाचा उलगडा केला, गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी दीपमाला कुळमेथे व वर्षा परचाके ला वरोरा मधून ताब्यात घेतले तर आरोपी प्रवीण व नाझीर ला नागपुरातून अटक करण्यात आली. आरोपींनि सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस निरीक्षक योगेश पारधी, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि निंभोरकर, भद्रावती सपोनि वीरेंद्र केदारे, सपोनि संजय मिश्रा, पोउपनि प्रियांका गेडाम, भद्रावती व गुन्हे शाखा पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, धर्मराज मुंडे, योगेश घाटोळे, संतोष राठोड, प्रेमकुमार बावनकर, रोहित चिटगिरे, करिष्मा जुनघरी, नितीन कुरेकार, किशोर वैरागडे, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, अमोल सावे, गोपी नरोटे, शेखर माथनकर, दिनेश अराडे व ऋषभ वर्कींगे यांनी केली.                  

Leave a Comment

+