Horticulture Cluster Scheme: चंद्रपूरजवळ 100 कोटींचा भाजीपाला क्लस्टर कसा उभारणार?

May 07, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम 2021 पासून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहेसन 2025 मध्ये नवीन मागदर्शक सूचनांन्वये मल्टी कमोडीटी हाय व्हॅल्यू क्लसस्टर्स आणि पेरी अर्बन भाजीपाला क्लस्टर या दोन संकल्पनांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. (चंद्रपुरात अवजड वाहने शहराबाहेरून जाणार)

 

या येाजनेचा मुख्य उद्देश प्रमुख शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर्स विकसित करणेभाजीपाला संकलनसाठवणूक आणि विपणन यांची व्याप्ती वाढविण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्थासहकारी संस्था आणि नव द्योजक संस्थांना प्रोत्साहन देणेदेशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी एकात्मिक पध्दतीने लॉजिस्टिक्समार्केटींग आणि ब्रॅडिंगमध्ये पूर्व-उत्पादनउत्पादन काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन याद्वारे कृषी मूल्य साखळीच्या अडचणी दूर करणे व उत्पादनाच्या कापणीनंतरचे हाताळणीमूल्यवर्धन आणि बाजार जोडणी याकरिता पायाभूत सुविधांचा विकास /विस्तारसुधारणा करणे हा आहे.

 

पात्र लाभार्थी : शेतकरी उत्पादक संघटना आणि त्यांच्या संस्थाकंपन्या किंवा त्यांचे संयोजन यांचा समावेश असलेल्या कायदेशीर संस्था पात्र असतील.

समाविष्ट पिके : क्लस्टरमध्ये प्रमुख फलोत्पादन पीक असणे आवश्यकया प्रमुख पिकाव्यतिरिक्तकल्स्टरमध्ये कृषी विविधता आणि उत्पादक्ता वाढविण्यासाठी अतिरीक्त फलोत्पादन पिके देखील समाविष्ट केली जाऊ शकतात.

निवडीचे निकष : क्लस्टरचा समावेश असलेली जमीन ही शक्य तितक्या प्रमाणात सलग असावीजर जमीन क्षेत्र संलग्न नसेल तर कमाल दोन ठिकाणांमधील अंतर डोंगराळ भागात असल्यास 50 किमी आणि सर्वसाधारण भागात असल्यास 80 किमी पेक्षा जास्त नसावेकिमान वार्षिक किंमत 100 कोटी असावीएकूण प्रकल्प मूल्यामध्ये शेतकरी घटक कमीत कमी 40 टक्के असावा.

पेरी-अर्बन उत्पादन : 1) शेतक-यांनी राबविण्याचे घटक-पिकाचे लागवड साहित्यशेतीचे यांत्रिकीकरणसुक्ष्म सिंचनएकात्मिक गुल्यद्रव्यकिड व्यवस्थापनआधुनिक तंत्रज्ञान इ. 2) अंमलबजावणी यंत्रणा यांनी राबविण्याचे घटकशेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना व प्रोत्साहनशेतकऱ्यांची / उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणीसुधारीत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब आणि प्रसारशेतीचे यांत्रिकीकरणसुक्ष्म सिंचन इ.

काढणीपश्चात व्यवस्थापन आणि वितरण : संकलन व वितरण केंद्रएकात्मिक पॅक हाऊसरायपनिंग चेंबरपूर्वशीतकरण गृहशीतखोलीशीतवाहनप्रक्रिया केंद्र यांची निर्मिती व विस्तारीकरणशीतगृह उभारणीमुल्यवर्धन आणि पॅकेजींग इसदर घटक हे अंमलबजावणी यंत्रणांनी राबवयाचे आहेत.

अनिवार्य पिके : टोमॅटोकांदा आणि बटाटा याव्यतिरिक्त कोबीफ्लॉवरभेंडीवांगीशिमला मिरचीकाकडीदुधी भोपळाकोथिंबीरलिंबूआलेहिरवी मिरचीलसूण इ.

 

अर्ज करण्याची कार्यपद्धती : 1) प्रस्ताव सादर करण्याकरीता अंमलबजावणी यंत्रणेचे पात्रता निकष व सविस्तर मार्गदर्शक सुचना राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यांच्या https://nhb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत्यानुषंगाने अंमलबजावणी यंत्रणेकरीता इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेतसंबंधित क्लस्टर संदर्भात काही अडचणी असल्यास clusters.nhb@gov.in या ई-मेलवर कळविण्यात याव्यात. 2) सदर कार्यक्रमांतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे https://www.nhb.gov.in या वेबसाईटर अर्ज सादर करावेत.  3) अधिक माहितीसाठी सदर योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सुचना वेबसाईटवर उपलब्ध आहेतhttps://nhb.gov.in राष्ट्रीय बागवानी मंडळ यांच्या यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

Leave a Comment

+