प. बंगाल, आसाम, पुद्दूचेरी कौल: चंद्रपूर शहरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

May 04, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - आसामपश्चिम बंगाल व पुडुचेरी येथे भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात आयोजित जल्लोष कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीचंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक येथे हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. (भाजपचा विजय, चंद्रपुरात जल्लोष)

 

    यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारयुवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुविर अहिरमहामंत्री मनोज पालश्याम कनकमनामदेव डाहुलेसविता दंढारेमाजी उपमहापौर अनिल फुलझेलेतुषार सोमदशरथ सिंग ठाकूरबलराम डोडाणीसुधीर कारंगल, अमोल शेंडेमहिला महामंत्री सायली येरणेयुवा मोर्चा अध्यक्ष मयूर वाढईअनुसूचित जमाती अध्यक्ष तथा नगरसेवक जितेश कुळमेथेगटनेता शेखर शेट्टीनगरसेवक संजय कंचर्लावारभालचंद्र दानव, नितेश गवळी,  नगरसेविका अनुजा तायडेआशा देशमूख, सारिका संदुरकर, मजुश्री कासनगोट्टूवारअनुसूचित जाती अध्यक्ष विमलताई कातकरविनोद शेडकीमंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे अल्पसंख्यांक अध्यक्ष राशीद हुसेनकौसर खानसुजाता कापसेकामगार झोपडपट्टी अध्यक्ष रामकुमार अकापल्लीवारसिनेट सदस्य निलेश बेलखेडेप्रलश मशाखत्रीप्रमोद शास्त्रकारप्रविण गिलबिलेसतीश तायडेभाजप नेते शिरीष गोगलवारसागर बोरेवारभाग्येश्री हांडेेसुमित बेलेप्रतिक शिवणकरकार्तीक बोरेवारराकेश नाकाडे,  बबलु मेश्रामईश्वर वाघमारेरेषमा पांडे विनोद पेंडलीवारसुरेंद्र अंचलआदींची उपस्थिती होती.

 

      यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरातफटाक्यांची आतीषबाजी करत तसेच लड्डू वाटप करून कार्यकर्ते व समर्थकांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला होता.

 

पक्षाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल एकमेकांचे अभिनंदन करत सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. एकूणचभारतीय जनता पार्टीच्या विजयाचा हा जल्लोष चंद्रपूरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यालयात घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.  कार्यक्रमाला शहरातील पदाधिकारीकार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

+