चंद्रपूर BJP Mayor हटणार नाहीत: हंसराज अहीर यांचा ठाम विश्वास

May 02, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर या भाजपच्या महापौर आहेत आणि भाजपचा महापौर व सर्व पदाधिकारी आपला कार्यकाळ पूर्ण करेलत्यांना पदावरुन कोणी हटवू कणार नाहीभाजप व सत्तेत मित्रपक्ष असलेल्या पक्षांचे नगरसेवक विकासाच्या बाजूने उभे असून महानगरपालिकेचा कार्यकाळ भाजप व मित्रपक्ष पूर्ण करेल असा विश्वास पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नुकत्याच नगरसेवकपदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत व्यक्त करीत विरोधी नगरसेवक व कॉंग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्त्यव्याचा खरपूस समाचार घेतला. सदर बैठकीस भाजपचे जेष्ठ नेते विजय राऊतखुषाल बोंडेमहापौर संगीता खांडेकरप्रकाष देवतेळेतुषार सोमबलराम दोडाणीसुभाश कासनगोट्टृवाररवि गुरनुलेश्याम कनकमसविता दंडारेविनोद शेरकीराजेंद्र अडपेवाररथसिंग ठाकूर उपस्थित होते. (चंद्रपूर महापौरांना पदावरून हटवा - पप्पू देशमुख)

 

                पदाधिकार्यांनी हराच्या विकासासाठी एकजुटीने काम करीत महापौर यांच्या पाठीशी उभे राहत विरोधकांना उत्तर द्यावे असे आवाहन करीत सर्व नगरसेवकांनी विकासकामांवर भर द्यावापक्षाच्या हितासाठी काम करासर्व एक होवून पालिकेत काम करण्याच्या सुचना ही यावेळेस उपस्थित नगरसेवकांना हंसराज अहीर यांनी केल्या. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप सक्षमपणे काम करत असून विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. विरोधकांनी अषा प्रकारचे राजकारण करण्याऐवजी विधायक भुमिका घ्यावी असेही अहीर म्हणाले.

 

                या बैठकीत दिनकर सोमलकरविठ्ठल डुकरेराजु घरोटेविकास खटीपुनम तिवारीगौतम यादवप्रदीप किरमेसुदामा यादवनगरसेवक अॅड. सारीका संदूरकरभालचंद्र दानवजितेष कुळमेथेनितेष गवळीसरला कुळसंगेशा देमुखअनुजा तायडेपुश्पा उराडेवंदना हातगांवकरसुधीर कारंगलविमल काटकरसायली येरणेकौसर खानशशिकांत म्हस्के आदींची उपस्थिती होती.  

Leave a Comment

+