बल्लारपूर - मध्यप्रदेश राज्यातील मजूर बांबू कटाईच्या कामाकरिता बल्लारपुरात आले होते, तब्बल २४ मजूर पोंभुर्णा मध्ये बांबू कटाईचे काम करीत होते, काम झाल्यावर १ मे रोजी मजूर ठेकेदाराला पैसे मागण्यास गेले मात्र आज पेमेंट होणार नाही, दोन दिवस कारवा मार्गावरील जुनोना डेपो मध्ये थांबायला लावले, जेवण करून मजूर झोपले आणि एका चारचाकी वाहनाने डेपो मधील झोपडीला धडक दिली आणि एकाचा मृत्यू झाला. (चंद्रपुरातील नाना-नाणी पार्क जवळ वेडसर इसमाचा मृतदेह)
ठेकेदार आनंद धुर्वे यांनी मध्यप्रदेशातील मजुरांना पोंभुर्णा मध्ये बांबू कटाईचे काम असल्याचे सांगितले, त्याठिकाणाहून २४ मजूर कामासाठी चंद्रपुरात आले, पोंभुर्णा मधील काम संपल्यावर ठेकेदार धुर्वे यांच्या बंगाली कॅम्प मध्ये मजुरांनी पैसे मागितले, आज पेमेंट होणार नाही आपण सर्वानी माझ्या कारवा रोडवरील जुनोना डेपो मध्ये २ दिवस थांबायला सांगितले.
ठेकेदाराने चारचाकी वाहनाने सर्व मजुरांना डेपो मध्ये सोडले, जेवण झाल्यावर मजूर डेपो मधील झोपडी जवळ झोपले होते, २ मे ला मध्यरात्री २.३० वाजता अनियंत्रित चारचाकी वाहन क्रमांक MH४९ CS ६८४४ ने झोपडीला धडक दिली, अचानक झालेल्या या घटनेत मजूर खळबळून जागे झाले व इकडे तिकडे पळू लागले.
झोपडीला धडक बसल्याने भिंत पडली, यामुळे भिंतीजवळ झोपलेले ५५ वर्षीय देवलाल शामलाल पंधरे राहणार चारगाव जिल्हा मंडला मध्यप्रदेश यांच्या अंगावर भिंत कोसळली, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहन चालक पसार झाला. पोलिसांनी या प्रकरणी वाहन चालकावर कलम १०६(१), २८१ अनव्ये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहे.
Leave a Comment