चंद्रपूर - चंद्रपूर शहरात अपघाताची मालिका सुरु झाली, दोन दिवसात ३ निष्पाप नागरिकांचा अपघातात बळी गेला, कारण रस्त्यावरील बेदरकारपणे उभे केलेले वाहन, नागरिकांना जायला रस्ता नाही, रस्त्यावर वाहने चालविताना कुणीही सुरक्षित नाही. वाहतूक नियंत्रण विभाग स्वतः अनियंत्रित झाला असल्याचे चित्र आहे. ३ नागरिकांचा बळी गेल्यावर आज प्रशासनाला जाग आली, जिल्हाधिकारी वसुमना पंत व पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्वतः बंगाली कॅम्प चौकात दौरा करीत त्या अपघातप्रवण स्थळाची पाहणी करीत प्रशासनाला पुन्हा दुर्घटना होणार नाही यावर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. (नागपुरातून येणारी एमडी पावडर जप्त, गुन्हे शाखेची कारवाई)
चंद्रपूर शहरात अतिक्रमण व नियमबाह्य वाहने रस्त्याच्या कडेला उभे करणे हि नित्याचीच बाब झाली आहे, वाहतूक पोलीस फक्त वाहतूक सिग्नलवर दिसतात, शहरातील अस्तव्यस्त वाहतूक त्यांना दिसत नाही, केवळ नो पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत चारचाकी वाहनांवर मात्र दुर्लक्ष करण्याचे काम करतात. यामुळे बंगाली कॅम्प चौक, सावरकर चौक, जनता कॉलेज चौक हे अपघातप्रवण स्थळ झाले आहे.
यावर भाजप महामंत्री मनोज पॉल यांनी वाईन शॉप मुळे मद्यपी रस्त्यावर वाहने उभे ठेवतात ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो असे निवेदन जिल्हाधिकारी याना दिल्यावर सुद्धा त्यावर कारवाई झाली नाही, आम आदमी पक्षाच्या वतीने मयूर राईकवार यांनी सुद्धा वाहतुकीची अव्यवस्थेची वस्तुस्थिती पोलीस अधीक्षकांसमोर मंडळी होती. ३ नागरिकांचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग आली, यावेळी बंगाली कॅम्प चौकात असलेले अतिक्रमण काढण्यात यावे व मार्गावर गतिरोधक चे निर्माण करण्याच्या चर्चा यावेळी झाल्या. रिअक्शन झाल्यावर ऍक्शन होते असे चित्र चंद्रपुरात दिसत आहे, अपघातात नागरिकांचा जीव गेला नसता तर आज प्रशासन याठिकाणी पाहणीही करण्यासाठी भिरकले नसते.
Leave a Comment